नाशिक : इमाम कौन्सिलच्या राज्याध्यक्ष मौलाना इरफानला एटीएसकडून अटक

मालेगाव,www.pudhari.news

 मालेगाव मध्य : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
पॉप्युलर फंट ऑफ इंडिया (पीएफआय) या केंद्र सरकारने बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित असल्याच्या कारणावरुन मालेगावातून अजून एका मौलानास दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. मौलाना इरफानखान दौलतखान नदवी असे या मौलानाचे नाव असून, रविवारी (दि.13) रात्री उशिरा त्यास ताब्यात घेतले गेले. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

रविवारी रात्री मुंबईच्या एटीएस पथकाने येथील दिद्दा कॉलनीत राहणार्‍या मौलाना नदवी यांना अटक केली. पीएफआय संघटनेवर बंदी असूनही त्यास मदत करीत असल्याच्या आरोपातून ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. मौलाना नदवी यांना युएपीए कायद्यान्वये एटीएसच्या काळाचौकी ठाणे येथील पथकाने ताब्यात घेतले असून, अधिक चौकशीसाठी नाशिक येथे नेण्यात आले आहे. मौलाना नदवी यांंना न्यायालात हजर केले असता 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मौलाना नदवी हे इमाम कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. राज्यात गेल्या महिन्यात एनआयएच्या पथकाने अनेक ठिकाणी मुस्लिम पॉप्युलर फंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्ते व कार्यालयांवर छापेमारी केली होती. यात मालेगावातील पीएफआयचा जिल्हाध्यक्ष मौलाना सहेफूर रहमानला अटक झाली होती.

त्यानंतर स्थानिक पोलिसांनी इमाम कौन्सिलचा राज्याध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवी व सादेन अन्सारी या दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयाच्या आदेशाने दोन दिवस स्थानबद्ध केले गेले होते. त्यानंतर आता ‘एटीएस’नेच मौलाना इरफान यास अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : इमाम कौन्सिलच्या राज्याध्यक्ष मौलाना इरफानला एटीएसकडून अटक appeared first on पुढारी.