नाशिक : इस्कॉन मंदिरात राधाष्टमी उत्सव जल्लोषात, हजारो भाविकांनी लावली हजेरी

इस्कॉन मंदिर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉन मंदिरामध्ये ‘राधे..राधे..’च्या घोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री राधाष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर साजरा करण्यात येणारा हा दुसरा मोठा महोत्सव आहे.
राधाष्टमीनिमित्त मंदिराची, तसेच श्री राधा-कृष्णाच्या विग्रहांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महोत्सवाला सकाळी 5 वाजता मंगल आरतीपासूनच सुरुवात झाली.

त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती व श्रीमत भागवत प्रवचन झाले. राधाराणीचे गुणगान करणारे राधिकाष्टकमचे स्तवन तसेच अन्य व—जभक्तिगीते सादर करण्यात आली. श्रीश्री राधा-कृष्णाच्या विग्रहांचा दुपारी पंचामृताने अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर महाआरती व महाभोग अर्पण करण्यात आला. दुपारी 12 वाजता 56 भोग राधाराणीला अर्पण करण्यात आले व महाआरती करण्यात आली.

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, उत्सव समितीप्रमुख लीलाप्रेम प्रभू व अच्युत प्राण प्रभू, गोपालानंद प्रभू, रणधीर कृष्ण प्रभू, सार्वभौम कृष्ण प्रभू, मारुतीप्राण प्रभू, आनंद चैतन्य प्रभू, सुमेध पवार, अकिंचन दास, सेवाप्रमुख नादिया कुमार दास, तुलसी सेविका माताजी, प्रिया गोरे माताजी आणि इतर अनेक कृष्णभक्तांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

The post नाशिक : इस्कॉन मंदिरात राधाष्टमी उत्सव जल्लोषात, हजारो भाविकांनी लावली हजेरी appeared first on पुढारी.