
नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उघड्यावर दारू पिऊन उपद्रव करणाऱ्या दहा जणांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नम्रता पेट्रोलियम समोरील मोकळ्या जागेत काही व्यक्ती मद्यप्राशन करून उपद्रव माजवत असल्याच्या गोपनीय माहितीनुसार पेट्रोलिंग दरम्यान अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दहा जणांना मद्यपान करताना रंगेहाथ अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त परिमंडळ २ चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त अंबड विभाग सोहेल शेख यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक संदिप पवार,अंमलदार रविंद्र पानसरे, किरण गायकवाड, जर्नादन ढाकणे, दिपक जगताप, अनिल ढेरंगे, संदिप भुरे आदींच्या पथकाने केली. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापुढे अशीच कारवाई सुरू राहणार असून सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून कोणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तडीपरीची कारवाई देखील करण्यात येईल असा इशारा अंबड पोलिसांनी दिला आहे.
हेही वाचा:
- कोल्हापूर : दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पात्र पडले पुन्हा कोरडे; पाण्याचा प्रश्न बनला गंभीर..!
- IND vs AUS : अहमदाबाद कसोटीत ९ धावा केल्यानंतर पुजारा करू शकतो सचिन-द्रविडच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री
- बेळगाव : बेकिनकेरेत झाडावरील पाला काढताना विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू
The post नाशिक : उघड्यावर मद्य पिणाऱ्या उपद्रवींवर कारवाई appeared first on पुढारी.