Site icon

नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता

नाशिक/पुणे : पुढारी वृत्तसेवा

पश्चिमी चक्रावाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहत आहेत. याच्या परिणामामुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मालेगाव, इगतपुरी, ठाणे, रायगड, पालघर, नगर, चाळीसगाव, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती या भागासह उर्वरित ठिकाणी 8 मार्चपर्यत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह किमान 10 ते 20 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांत 7 मार्चच्या आसपास गारपीट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हिमालयीन भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढला आहे. परिणामी या भागाकडून राज्याकडे जोरदार वारे वाहू लागले आहेत. तसेच आग्नेय आणि दक्षिण भागाकडून देखील राज्याकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दरम्यान, कोकणवगळता संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून ते बुधवारपर्यंत गडगडाटांसह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची तर मंगळवारी गारपिटीची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारपासून दुपारच्या कमाल व पहाटेच्या किमान तापमानात घसरण होईल.

पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे उत्तर भारताकडून गुजरात, मध्य प्रदेश तसेच पुढे महाराष्ट्राकडे वारे वाहत तसेच आग्नेय आणि दक्षिण भारताकडूनदेखील राज्याकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. – डॉ. रामचंद्र साबळे, हवामान अभ्यासक

हेही वाचा:

The post नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता appeared first on पुढारी.

Exit mobile version