नाशिक : उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुखपदी निवड होताच ॲड. शुभांगी पाटील यांची गाडेकर निवासस्थानी सदिच्छा भेट

शुभांगी पाटील www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पहिल्या उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख दिवंगत सत्यभामा गाडेकर यांच्या निवासस्थानी शुभांगी पाटील यांनी बुधवारी (दि.२२) सायंकाळी सदिच्छा भेट दिली. पाटील यांची नव्याने उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख पदी निवड झाली. त्यामुळे त्यांनी ही सदिच्छा भेट दिली. यावेळी गाडेकर कुटुंबीयांना गहिवरून आले होते.

नाशिक पदवीधर मतदार संघातून शिवसेनेकडून उमेदवारी करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शुभांगी पाटील यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिकरोड येथील गाडेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. उत्तर महाराष्ट्र महिला संपर्कप्रमुख या पदावर कामकाज करण्यापूर्वी पाटील यांनी भेट दिल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. महिला आघाडीचे कामकाज करताना आपण उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करून पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचविणार असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी दिवंगत सत्यभामा गाडेकर यांचे पुत्र योगेश गाडेकर, जयश्री गाडेकर, पल्लवी गाडेकर, चैताली गाडेकर, स्वाती गाडेकर, कल्पना गाडेकर, योगिता गाडेकर आदींनी पाटील यांचे स्वागत व औक्षण केले. यावेळी कामगार नेते जयंतजी गाडेकर, लक्ष्मण गाडेकर, मंदाताई गवळी, योगेश देशमुख, मसुद जिलानी, स्वप्निल औटे, अमित भगत, स्वप्निल शहाणे, प्रविण वाजे, संदिप आहेर, दिपक काळे, हेमंत रौदाळे आदि. उपस्थित होते. गाडेकर कुटुंबीयांनी पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा:

The post नाशिक : उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुखपदी निवड होताच ॲड. शुभांगी पाटील यांची गाडेकर निवासस्थानी सदिच्छा भेट appeared first on पुढारी.