नाशिक : ‘उद्योगविश्व-2023’मध्ये मिळणार नवउद्योजकांना धडे

उद्योजक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कॉलेजरोड, गंगापूररोड वाणी मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. 26) दुपारी 4 ला रावसाहेब थोरात सभागृहात ’उद्योगविश्व 2023’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात स्पर्धात्मक युगामध्ये समाजातील उद्योजकांच्या होत असलेल्या प्रगतीला गती मिळावी, व्यापार, व्यवहारातील बदल, स्टार्टअप याविषयीची माहिती, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, ध्येय, उद्दिष्टे, लघु व मध्यम उद्योगांतील संधी व सरकारी योजना या विषयांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योजक तथा मार्गदर्शक व्याख्यान देणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष योगेश राणे, संस्थापक अध्यक्ष नितीन दहीवेलकर, विश्वस्त योगेश मालपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ’उद्योगविश्व 2023’ कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्र, नाशिकचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, राष्ट्रीय लघु उद्योग निगम लि. नाशिकचे उपमहाप्रबंधक विकासचंद्र नाईक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, मुंबई येथील बिझनेस कोच स्वप्निल गिते यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नाशिककरांना होणार आहे. सोबतच जयेश टोपे, प्रितीश महाजन, पुष्पकराज साळुंखे, निखिल देवरे, उद्योजक कमलेश घुमरे आदींच्या चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष राणे यांनी सांगितले. दरम्यान, ’उद्योगविश्व 2023’ या कार्यक्रमास जास्तीत जास्त उद्योजक, व्यावसायिक तसेच नवउद्योजक व भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक प्रवीण अमृतकर, पवन बागड, हर्षद चिंचोरे, अमोल शेंडे, अविनाश कोठावदे, सुधीर नावरकर, प्रशांत मोराणकर, चेतन येवला, राकेश ब्राह्मणकर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला संजय दुसे, संजय बागड, महेश पितृभक्त, राजेंद्र कोठावदे, नीलेश मकर, हितेश देव, भगवंत येवला, ड. देवदत्त जायखेडकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘उद्योगविश्व-2023’मध्ये मिळणार नवउद्योजकांना धडे appeared first on पुढारी.