
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
नाशिकसह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या दाहकतेपासून वाचविण्यासाठी येथील रविवार कारंजा येथील सुप्रसिद्ध चांदीच्या गणपतीला जवळपास 21 किलो चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. सोबत 51 किलो मोगऱ्याच्या फुलांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून त्यामुळे मंदिरात चंदनासह मोगऱ्याचा सुंगध दरवळतो आहे.
दिवसभर सूर्य आग ओकत असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे. अंगाची लाही लाही होत असताना शहरातील चांदीच्या गणपतीला उन्हाच्या दाहकतेपासून वाचविण्यासाठी चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेपासून गणपतीच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने हा लेप लावण्यात आला असून त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात शितलता निर्माण झाली आहे. विधीवत पूजा करुन हा लेप लावण्यात आला आहे. चांदीच्या गणपती मूर्तीची दाहकता कमी व्हावी, यासाठी पारंपारिक पद्धतीने मृदू, पवित्र चंदन उटी केली जाते. वैशाख वणवा सुरू झाल्यानंतर हा चंदनाचा लेप लावण्याची अनोखी परंपरा आहे.
असा आहे मूर्तीचा इतिहास
नाशिकमधील रविवार कारंजा (आरके) परिसरात हे मंदिर आहे. 90 वर्षांची पंरपरा या मंदिराला आहे. मंदिरातील मूर्ती ही चांदीची असल्याने विशेष महत्व आहे. सन 1978 साली येथील रविवार कारंजा मित्र मंडळाने गणपतीची मूर्ती चांदीची बसविण्याचा निर्णय घेतला. चांदीची मूर्ती बसविण्यात आल्यापासून हे मंदिर नाशिककरांचे आकर्षण ठरले.
हेही वाचा :
- The Kerala Story : जम्मू-काश्मीरमध्ये दोन गटात वाद, ५ वैद्यकिय विद्यार्थी जखमी
- Amazon Lays Off : अॅमेझॉनकडून भारतातील 500 कर्मचाऱ्यांना नारळ
- पारनेर : राष्ट्रवादीने शिवसेनेला फसविले : डॉ. श्रीकांत पठारे
The post नाशिक : उन्हाच्या दाहकतेमुळे चांदीच्या गणपतीला चंदनाचा लेप appeared first on पुढारी.