नाशिक : उपनगर परिसरात तीन लाखांची चोरी

चोरी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या विजय-ममता सिनेमागृहाच्या पाठीमागे एका अपार्टमेंटमध्ये बंद दरवाजाचे कडीकुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख रकमेसह सुमारे 80 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन भालचंद्र जोशी (रा. वरद शिल्प अपार्टमेंट, विजय-ममता सिनेमागृहामागे, नाशिक-पुणे रोड) यांनी उपनगर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जोशी यांचे घर बंद असल्याच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून बेडरूमधील कपाटातून दोन लाख रुपये रोख तसेच तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 25 हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या समयी तसेच 25 हजार रुपये किमतीची अंगठी असा ऐवज चोरून नेला. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : उपनगर परिसरात तीन लाखांची चोरी appeared first on पुढारी.