नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या अमृता पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या अमृता पवार यांनी मंगळवारी (दि. १४) दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यामुळे निफाड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जाते आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार स्व. डॉ. वसंतराव पवार आणि नाशिक जिल्हयातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे राजकिय वर्तुळात ही मोठी घटना मानली जाते. कोपरगावचे माजी आमदार स्व. शंकरराव कोल्हे यांच्या अमृता पवार नात आहे. पवार जिल्हा परिषद प्रतिनिधी असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेचा देवगाव गट विधानसभा निवडणुकीत येवला मतदार संघात जोडला गेला आहे. त्यामुळे सन २०२४ मध्ये होणाऱ्या राज्याच्या विधानसभा पंचवार्षिक निवडणूकीत अमृता पवार येवला मतदार संघातून भाजपच्या उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा या प्रवेश सोहळ्यानंतर होऊ लागली आहे. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, ना. गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले आदी उपास्थित होते.

भुजबळ पवार सामना 
राष्ट्रवादीच्या अमृता पवार यांच्या भाजप प्रवेशाने येवला विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचे राजकीय समीकरण बदलण्याचे बोलले जाऊ लागले आहे. २०२४ मध्ये येवला विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून माजी मंत्री छगनराव भुजबळ विरुद्ध भाजपच्या अमृता पवार असा राजकिय सामना करायला पाहायला मिळू शकतो. दरम्यान पवार यांच्या भाजप प्रवेशाने येवल्याची राजकिय समीकरण बदलणार की नाही? याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले दिसत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या अमृता पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश appeared first on पुढारी.