
नाशिक(दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा
नाशिक एअरपोर्टवर बिबट्या असल्याच्या घटना वारंवार चर्चिल्या जात होत्या. परंतु काल सकाळी साडेआठ वाजता चक्क बिबट्याने दर्शन दिल्याने सुरक्षारक्षकासह उपस्थित सर्वांचीच भंबेरी उडाली.
ओझर एअर फोर्स परिसरात या अगोदर बिबट्याने अनेकदा दर्शन घडवले आहे. यापूर्वी या परिसरात बिबट्याचा अनेक ठिकाणी संचार असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, आता थेट एअरपोर्टवर बिबट्याने दर्शन दिल्याने एअरपोर्ट परिसरात हा विषय गांभीर्याने चर्चिला जात आहे. एअरपोर्ट कर्मचारी व प्रवाशी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बिबट्याचा येथील वावर धोक्याचे आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा :
- नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध; शिंदे गटात गेलेल्यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
- Boxing Day Test : बॉक्सिंग-डे कसोटीवर कांगारूंचे निर्विवाद वर्चस्व; अॅलेक्स कॅरीचे शतक; दक्षिण आफ्रिका संकटात
- नगर : अवैध मद्यविक्रीवर पोलिसांचा वॉच
The post नाशिक एअरपोर्टवर बिबट्या, सुरक्षा रक्षकासह सर्वांचीच उडाली भंबेरी appeared first on पुढारी.