नाशिक : एकदंत नगरला नाल्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाल्यात आढळला युवकाचा मृत्यू,www.pudhari.news

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

शुभमपार्क जवळील एकदंत नगर भागात युवकाचा मृतदेह नाल्यात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मयत युवकाचे नाव सिध्देश्वर साठे (३५ ) रा. बुलढाणा असे आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की,  एकदंत नगर भागातील नाल्यात युवकाचा मृतदेह असल्याची माहिती नागरिकांना सकाळी समजली. या नंतर नाल्या जवळ नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक बिडकर पवार, पोलिस नाईक पवन परदेशी आदी घटनास्थळी पोहोचले . पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

हा युवक सिडको अंबड भागात तो कोठे राहतो त्याचा तपास पोलिस करीत आहे. तसेच या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत सिद्धेश्वर रात्री नाल्यात कसा पडला या बाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. अंबड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : एकदंत नगरला नाल्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.