नाशिक : एक राइट स्वाइप तुम्हाला आणू शकतो अडचणीत

डेटींग ॲप www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ
महाविद्यालयीन तरुण-तरुणी, विवाह मोडलेले, विवाह होणारे व नोकरी करणारे असे अनेक जण आपला एकटेपणा घालवण्यासाठी ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करतात. लॉकडाऊननंतर ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सचा वापर अधिक वाढला आहे. हे अ‍ॅप वापरायला सोपे वाटत असले तरी यात काही छुप्या गोष्टी दडलेल्या असतात. त्यामुळे तुमचे एक राइट स्वाइप तुम्हाला अडचणीतदेखील आणू शकते.

सध्या देशभरात गाजत असलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणात दोघांची ओळखदेखील डेटिंग पवर झाली होती. ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप वाईट असतातच असे नाही. मात्र, ते वापरताना खबरदारी घेतली पाहिजे. अ‍ॅप्समुळे काहींना त्यांचे खर प्रेम मिळते, तर काही त्यात पुरते फसवले जातात. ऑनलाइन भेटणारे मुलगा-मुलगी एकमेकांसाठी अनोळखी असतात. त्यामुळे डेटिंग अ‍ॅपवर पूर्ण नावाचा उपयोग करणे शक्यतो टाळावा. मॅच मिळाल्यावर स्वत:विषयी सर्व माहिती न सांगता अनोळखी व्यक्तीशी बोलत आहात हे नेहमी लक्षात असावे. मैत्री झाल्यानंतर लगेच मोबाइल नंबर शेअर करण्याची घाई न करता एक गुगल फोन नंबर द्या आणि तो फोनवर फॉरवर्ड करा. एकदा गुगल व्हॉइसमध्ये लॉग इन केल्यानंतर फक्त क्षेत्र कोड आणि उपलब्ध फोन नंबर निवडायचा असतो. नव्याने प्रोफाइल बनवण्यासाठी प्रत्येक डेटिंग अ‍ॅपची प्रोसेस वेगवेगळी असते. साइनअप करण्यासाठी मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, नाव, पत्ता, माहितीची गरज पडू शकते. अतिसेफ्टी गाइडलाइन देणारे अ‍ॅप वापरताना यूझर्सला जास्त प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू शकतात. अशावेळी सर्व गाइडलाइन फॉलो करा. जे अप नोंदणी करण्यासाठी पैशांची मागणी करतात ते प्रायव्हसी सुविधा देतात. उदा- टिंडर अ‍ॅपवर स्वत:चे लोकेशन सांगायचे नसेल तर त्यासाठी टिंडर प्लसचा वापर करता येतो.

ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप वापरताना पहिल्यांदा व्हिडिओ कॉल करताना कॅमेर्‍याचा अँगल व्यवस्थित सेट आहे का नाही त्याची खबरदारी घ्यावी. त्याचबरोबर मुलगा/ मुलगी एकमेकांसाठी अनोळखी असल्याने क्रिमिनल रेकॉर्ड चेक करावे त्यानंतरच मैत्री करावी. – डॉ. तन्मय दीक्षित (सायबर संस्कार).

डेटिंग अ‍ॅप वापरताना काय खबरदारी घ्यावी…
डेटिंग अ‍ॅपवर सोशल मीडियाचे खाते अ‍ॅटॅच करू नये.
डेटिंग अ‍ॅपच्या बिल्ट इन मेसेज प्लॅटफॅार्मचा वापर करावा.
एकटेपणाच्या भावनेशी खेळून फसवणूक होऊ शकते.

हेही वाचा:

The post नाशिक : एक राइट स्वाइप तुम्हाला आणू शकतो अडचणीत appeared first on पुढारी.