
ओझर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार, मानवी आरोग्याच्या दुष्टीने गुटखा पानमसाला सुगंधीत तंबाखू विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक ग्रामीण जिल्ह्यात दि. ६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत गुटखा विरोधी अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत ओझर पोलीसांनी २० लाखांच्या गुटख्यासह दहा लाख रूपयांचे वाहन असे एकूण तीस लाख बावन्न हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करत यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित अन्न पदार्थ पानमसाला सुगंधीत तंबाखूचा साठा नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव ते नाशिकच्या बाजूने गस्त घालत असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरशर टेम्पो हा जात असताना सदर गाडीस एचएएल टाउनशीप गेट नंबर तिन समोर थांबवण्याचा इशारा केला. सदर टेम्पो चालकाने टेम्पो थांबवला असता त्याला पोलीस गस्त पथकाने चौकशी केली. यावेळी टेप्मो चालकाने त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी गाडीत असलेल्या मालाची पावती मागितली असता चालकाने ई वे बील दाखवले. त्यात सिगारेटचे ३५० बॉक्स असल्याचे नमुद होते.
पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी सदर टेम्पो ओझर पोलीस ठाण्यात आणला. पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात सिगारेट खोके दिसून आले त्यानंतर आतली वेगळ्या पॅकिंगचे पांढरे पोते खाली उतरून उघडून बघितल्यावर त्यात मोठ्या प्रमाणावर तंबाखू मिश्रित पानमसाल्याचे पॅकेट दिसून आल्याने पोलीसांनी दिपक हरिप्रसाद चतुर्वेदी, मुकेशसिंग बनासिंग परमार यांच्याकडे चौकशी केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र डंबाळे यांच्या पथकाने केली.
हेही वाचलंत का?
- Punjab Triple Murder Case : पंजाब ट्रिपल मर्डरचे गुढ उलगडले; ‘या’ कारणामुळे शेजाऱ्याने केले कृत्य | Punjab Triple Murder Case
- Team of Bodyguard to protect Tomatoes : टोमॅटोचे दर वाढल्याने विक्रेत्याने ठेल्याजवळ नेमली बॉऊंसर्सची टीम
The post नाशिक : ओझर पोलीसांनी पकडला वीस लाखांचा गुटखा appeared first on पुढारी.