
ओझर : पुढारी वृत्तसेवा : येथील दत्तनगर मधील वसाहतीत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या आईचा आणि मुलीचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. तर जावई राहुल रणशूर व त्यांची दोन मुले लांब फेकल्याने बालंबाल बचावली. ही घटना आज (दि.६) दुपारी दीडच्या सुमारास घडली.
आई मीना हनुमंत सोनवणे, मुलगी आकांक्षा राहुल रणशूर अशी मृत मायलेकीची नावे आहेत. या दोघी घरावरील गच्चीतील पेरू तोडण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी हातातील रॉड विद्युत वाहिनीला लागल्याने त्यांना जोराचा धक्का बसला. राहुल रणशूर यांनी गच्चीवरून आरडाओरड ऐकू आल्याने त्यांनी धाव घेतली. कॉलनीतील नागरिकही धावून आले.
गच्चीतील पाण्याची टाकी फुटल्याने पूर्ण बंगल्यात वीज प्रवाह उतरला होता. ओझर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथे पाठवले. पुढील तपास ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करीत आहेत.
हेही वाचा
- नाशिक : भवानी तलाव ओव्हरफ्लो तरी नळाला पाणी नाही, सप्तशृंगगडावरील महिलांची पाण्यासाठी भटकंती
- नाशिक : येवल्यातील 33 बंधाऱ्यांच्या कामांची स्थगिती उठविली, 20 कोटी 82 लाखांचा निधी
- Nashik Police : ‘भयमुक्त नाशिक’साठी पाेलिस सरसावले
The post नाशिक: ओझर येथे पेरू काढताना विजेचा धक्का लागून मायलेकीचा मृत्यू appeared first on पुढारी.