नाशिक : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपचा जल्लोष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाला राजकीय आरक्षण दिल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी वसंतस्मृती कार्यालय येथे जल्लोष केला. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करीत आणि एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सुनील केदार, चंद्रकांत थोरात, सतीश रत्नपारखी, दिलीप देवांग, प्रकाश चेकोर, जान्हवी बिरारी, सुनील देसाई, चंद्रशेखर पंचाक्षरी, शिवाजी बरके, अविनाश पाटील, सुरेश खेताडे, रुची कुंभारकर, छाया देवांग, प्रतिभा पवार, शिवाजी गांगुर्डे, राकेश दोंदे, सतीश सोनवणे, अजिंक्य साने, उद्धव निमसे, मच्छिंद्र सानप, दिनकर आढाव, पुष्पा आव्हाड, इंदूबाई नागरे, यशवंत निकुळे, धनंजय माने, गणेश कांबळे, अरुण शेंदुर्णीकर, अनिल भालेराव, मिलिंद भालेराव, सुरेश पाटील, सुजाता करजगीकर, रोहिणी नायडू, मंजुषा दराडे, संगीता जाधव, रश्मी हिरे-बेंडाळे, ज्योती चव्हाणके, अमोल पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याबद्दल भाजपचा जल्लोष appeared first on पुढारी.