नाशिक : औद्योगिक वसाहतीच्या दुर्घटनेतील कामगाराचे निधन

file photo

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या ग्राफाइट कंपनीत मागील महिन्यात दुर्घटना घडल्याने एक कामगार गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान कामगाराचे निधन झाले आहे.

याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जहीर जाकीर हुसेन (३५, रा. भवरमळा, श्रमिकनगर, सातपूर) हा सातपूर औद्योगिक वसाहतीमधील ग्राफाइट कंपनीमध्ये कामाला होता. दि.११ जानेवारी २०२३ रोजी दुपारी बाराच्या सुमारास कंपनीमध्ये वेल्डिंग काम करीत असताना लोखंडी अँगल तुटून पडल्याने जहीरच्या डोक्याला, नाकाला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी (दि. ८ फेब्रुवारी) त्याचा मृत्यू झाला. नुकत्याच गोंदे येथील जिंदाल कंपनीत झालेल्या स्फोटात अनेक कामगारांचादेखील जीव गेला. तर सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक कामगार मृत्युमुखी पडले. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. मात्र, अद्यापही कामगार सुरक्षा धोरणाची योग्य अंमलबजावणी होत नाही. या कंपनीमध्ये पूर्वी अपघात होऊन कामगार मृत्युमुखी पडल्याच्या घटना आहेत. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार आबाजी मुसळे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : औद्योगिक वसाहतीच्या दुर्घटनेतील कामगाराचे निधन appeared first on पुढारी.