नाशिक औष्णिक वीज केंद्रातील चाळीस टक्के कामगार अजूनही पगारवाढीपासून वंचित 

एकलहरे (नाशिक) : नाशिक औष्णिक वीज केंद्रातील साठ टक्के कंत्राटी कामगारांची अल्प पगारवाढ झाली. परंतु, चाळीस टक्के कामगार अजूनही पगारवाढीपासून वंचित आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने पाठपुरावा केल्यावर संबंधित कंत्राटदारांनी तत्काळ बोनस दिला होता.

चाळीस टक्के कामगार अजूनही पगारवाढीपासून वंचित 

किमान वेतन व २० टक्के पगारवाढीसंबंधी वार्तांकनानंतर साठ टक्के कंत्राटदारांनी दोनशे ते अडीचशे, अशी पगारवाढ दिली. मात्र, चाळीस टक्के कंत्राटदार चोरवाट शोधून गेल्या वर्षभरात आपली ऑर्डरच नसल्याने पगारवाढ देता येत नसल्याचे कारण देत पगारवाढ देण्याचे टाळत आहेत. एक कामगाराने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की दहा वर्षांपासून आम्ही किमान वेतनापासून वंचित असताना हे पगारवाढ नाकारत आहेत. कामगार लवकरच मंत्रालयावर धडक देणार आहेत. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

वयाची मर्यादा देत घरी बसवले 
कामगारांना प्रत्यक्ष पगारवाढ न देता पगारवाढीचा फरक म्हणून कामगारांच्या खात्यात आगाऊ रक्कम जमा केली व पर्चेस व्हॅल्यू फरक म्हणून जमा केली. परंतु, प्रत्यक्षात ते कामगारांना वेतन दिले आहे. कळस म्हणजे सुमारे १५ ते २० कामगारांना ऑर्डर नाही व वयाची मर्यादा हे कारण देत घरी बसविण्यात आले आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

वर्षभर कामाची ऑर्डर नसल्याचे करण देत पगारवाढ रोखली आहे. किमान वेतन तर नाहीच नाही, पगारवाढही नाही. - शांताराम कोळपे, कंत्राटी कामगार