नाशिक औष्णिक वीज केंद्रात पुन्हा प्रतिनियुक्तीवर बदल्या; कामगार वर्गात आश्चर्य 

एकलहरे (जि. नाशिक) : कोरोनाशी लढत देत अखंड वीज पुरविण्यासाठी तत्पर असलेल्या नाशिक औष्णिक वीज केंद्रात सुमारे ५० अभियंते व ३५० कामगारांचा तुटवडा भासत असताना पुन्हा ३४ अभियंत्यांची प्रतिनियुक्तीवर बदली निघाल्याने कामगार वर्गात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

आजमितीला चारशे कर्मचाऱ्यांचा तुटवडा असताना व कोरोनाने ५० हून अधिक कर्मचारी-अभियंते बाधित असताना उर्वरित कामगारांवर कामाचा बोजा पडत आहे. तरी कार्यात कुठेही कमी राहू नये व वीजनिर्मिती सतत सुरू रहावी, यासाठी सुमारे चारशे कर्मचारी संख्या कमी असताना कामगार व अभियंते मात्र तारेवरची कसरत करीत ड्यूटी करीत आहेत. मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी ३४ अभियंत्यांच्या प्रतिनियुक्तीवर बदल्या (डेप्युटशन) आल्याने हे वीजनिर्मिती केंद्र आहे की प्रतिनियुक्तीवर कामगार-अभियंता पाठवण्याचे केंद्र, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

एकच संचाचा कामगार हवाय का? 
एकीकडे गरज असल्यास दुसरा संच सुरू करायचा व गरज नसल्यास एकच संच चालवायचा, तोही कमी क्षमतेने. दोन वर्षांपासून एक संचाचा कोळसा खासगी केंद्राला वळता केला आहे. एक संच कायमच झीरो शेड्यूलमध्ये बंद असतो. येथे एकच संचाचा कामगार वर्ग ठेवायचाय का, असा प्रश्न कामगार करत आहेत. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

पदनाम कमी संख्या 
अभियंते ४३ 
तंत्रज्ञ १ २१ 
तंत्रज्ञ २ १२३ 
तंत्रज्ञ ३ १८०