नाशिक : कपडे धुताना बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

surgana www.pudhari.news

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या राशा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या दोन सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, उंबरठाणजवळील राशा येथील चौथ्या इयत्तेत शिकणारी भूमिका नरेश राऊत (11) आणि दुसर्‍या इयत्तेत शिकणारी उज्ज्वला नरेश राऊत (8) या सख्ख्या बहिणी अकराच्या सुमारास राशा देऊळपाडा येथून बर्डी येथील गावतळे येथे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुताना थोरली बहीण भूमिका हिचा पाय घसरल्याने ती बुडाली असता तिला वाचवण्यासाठी उज्ज्वला हिने पाण्यात उडी मारली. मोठ्या बहिणीला वाचविण्याच्या नादात दोघींनी एकमेकांना घट्ट मिठी मारल्याने दोघींचा तलावात बुडून अंत झाला. दोघींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून, सायंकाळी पाचच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला.

हेही वाचा:

The post नाशिक : कपडे धुताना बहिणींचा तलावात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.