Site icon

नाशिक : कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस प्रशिक्षणासाठी सोमवारी मुलाखती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली येथील संघ लोकसेवा आयोगामार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी 16 एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नाशिकरोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात निःशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात 30 जानेवारीला मुलाखत घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओमकार कापले यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील सीडीएस परीक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सैन्य दलातील अधिकारीपदाची संधी उपलब्ध होण्यासाठी या मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्हा सैनिकी कार्यालयात सकाळी ११ ला या मुलाखती होणार आहेत. मुलाखतीस येताना सीडीएस-६० कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेले प्रवेशपत्र व त्यासोबत असलेले परिशिष्ट पूर्ण भरून ते मुलाखतीच्या वेळी सोबत आणावे. सीडीएस परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिकरोड येथे राज्य शासनातर्फे नवयुवक व नवयुवतींसाठी 1 फेब्रुवारी ते 7 एप्रिल कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 60 चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणार्थींच्या निवास, भोजन व प्रशिक्षणाची सोय निःशुल्क करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी 0253-2451032 या दूरध्वनी तसेच 8888798584 भ्रमणध्वनी क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कापले यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस प्रशिक्षणासाठी सोमवारी मुलाखती appeared first on पुढारी.

Exit mobile version