Site icon

नाशिक : करिअर मार्गदर्शनासाठी रविवारी विद्यार्थी समिट; माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची उपस्थिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येत्या रविवारी (दि.8) सकाळी 9.30 वाजता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सभागृहात विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी विशेष चर्चासत्र अर्थात विद्यार्थी समिटचे आयोजन करण्यात आले आहे. समिटचे उद्घाटन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे. दिवसभर चालणार्‍या या कार्यक्रमात नामवंत वक्ते विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती असोसिएशन ऑफ वुई प्रोफेशनल्सचे अध्यक्ष उदय घुगे यांनी दिली.

विद्यार्थी समिटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, आमदार किशोर दराडे, जीएसटी नाशिक विभागाचे उपआयुक्त विवेकानंद जाधवर, सर्वोच्च न्यायालयाचे वकील अ‍ॅड. अरविंद आव्हाड, एमआयटीच्या सहसचिव डॉ. आदिती कराड, भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अ‍ॅड. जयंत जायभावे, भरत गिते, बाळासाहेब दराडे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे घुगे यांनी सांगितले. विद्यार्थी समिटमध्ये अ‍ॅड. अरविंद आव्हाड (भारतीय संस्कृती व व्यक्तिमत्त्व विकास), बाळासाहेब दराडे (स्टार्ट अपमधील संधी व आव्हाने), क्रिकेटपटू संजय बांगर (क्रीडा क्षेत्रातील संधी), सत्यजित व अजिंक्य हांगे (अ‍ॅग्रो स्टार्टअप – संधी आणि आव्हाने) आदी मार्गदर्शन करणार आहे. तर दुपारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची प्रकट मुलाखत पत्रकार विलास बढे घेणार आहेत. दरम्यान, या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत आव्हाड, सचिव नीलेश ढाकणे, खजिनदार अविनाश आव्हाड, सचिव वैभव आव्हाड, अशोक कुटे यांनी केले आहे.

युवा सन्मान पुरस्कारांचे वितरण
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा माजी अध्यक्ष अ‍ॅड. सुधाकर आव्हाड यांच्या उपस्थितीत सायंकाळी युवा सन्मान पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, सुहास कांदे, के. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, मनपा शहर अभियंता नितीन वंजारी, अ‍ॅड. के. के. घुगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी नगरसेवक गणेश गिते, युवानेते उदय सांगळे आदी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : करिअर मार्गदर्शनासाठी रविवारी विद्यार्थी समिट; माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची उपस्थिती appeared first on पुढारी.

Exit mobile version