नाशिक : कर्मचार्‍यानेच केला मोबाइलसह अडीच लाखांचा अपहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नोकरीस असताना वस्तूविक्री केल्यानंतर आलेली रक्कम जमा न करता व स्टोअरमधील दोन महागडे मोबाइल घेत कर्मचार्‍यानेच अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी वसीम युसूफ शेख (24, रा. शिवाजीनगर, सातपूर) यांनी सातपूर पोलिस ठाण्यात मनोज सदाशिव जगताप (रा. सातपूर) याच्याविरोधात अपहाराची फिर्याद दाखल केली आहे. वसीम यांच्या फिर्यादीनुसार संशयित मनोज याने मार्च ते मे 2020 या कालावधीत अपहार केला. संशयित जिओ स्टोअर येथे कामास असताना त्याने दुकानातील 88 हजार 32 रुपये शॉर्ट स्वाइप करून व स्टोअरमधील वस्तूविक्री करून त्यातून आलेले 93 हजार 537 रुपये स्वत:कडे ठेवले. त्याचप्रमाणे मनोजने पुन्हा 18 हजार 500 रुपये रोख व सुमारे 50 हजार रुपयांचे दोन मोबाइल स्वत:कडे ठेवून दोन लाख 50 हजार 67 रुपयांचा अपहार केला होता. याबाबत वसीम यांनी पाठपुरावा केल्यानंतर मनोजने 93 हजार 500 रुपये पुन्हा भरले. त्यामुळे मनोजने एक लाख 56 हजार 567 रुपयांचा अपहार केल्याचे वसीम यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कर्मचार्‍यानेच केला मोबाइलसह अडीच लाखांचा अपहार appeared first on पुढारी.