नाशिक कलाग्राम अन्‌ येवल्यात शिवसृष्टीसाठी वाढीव निधी द्या; आदित्य ठाकरेंकडे समीर भुजबळांची मागणी 

नाशिक : नाशिकमधील कलाग्राम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकरकमी आठ कोटी आणि येवला येथे शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. या दोन्ही प्रकल्पांबाबत समीर भुजबळ यांनी ठाकरे यांची भेट घेतली. 

भुजबळ म्हणाले, की येवल्यात शिवसृष्टी उभारण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत १३ सप्टेंबर २०१९ च्या सरकार निर्णयानुसार चार कोटींना मान्यता मिळाली आहे. मात्र, या निधीत प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. प्रकल्पांतर्गत उर्वरित बाबींसाठी व शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अधिक रकमेची आवश्यकता आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर नाशिकमधील गोवर्धन येथे २०१४ मध्ये कलाग्राम उभारण्याचे काम हाती घेतले. या प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, निधीची आवश्‍यकता आहे. प्रकल्पांतर्गत प्रशासकीय इमारत, वर्कशॉप इमारत, खाद्यपदार्थासाठी गाळे व ९९ व्यापारी गाळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र प्रवेशद्वार, पुढील कुंपण भिंत, अंतर्गत रस्ता, बाह्य विद्युतीकरण, पाणीपुरवठा आदी कामे अपूर्ण आहेत, असेही भुजबळ यांनी ठाकरे यांना सांगितले

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार