
नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
कांद्याचे आगर समजल्या जाणाऱ्या कळवण तालुक्यात अवकाळी पाऊस झाल्याने शेतपिकांना मोठा तडाखा बसला आहे. तर काढणी आलेल्या गहूपिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
तालूक्यात विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 3.30 च्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात प्रामुख्याने कांदा , मिरची, गहू, टोमेटो, कोथिंबीर या भाजीपाल्यासह डाळिंब व आंबे या फळ पिकांचेही मोठे नुकसान होणार आहे. बहुसंख्य शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा:
- सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचा आरोप, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी
- मोठी बातमी : सिसोदिया यांना दिलासा नाहीच; ईडी कोठडीत आणखी ५ दिवसांची वाढ
- तळेगाव दाभाडे : विविध स्पर्धा परीक्षेत आत्मविश्वास वाढवावा
The post नाशिक : कळवणमध्ये अवकाळीने शेतपिकांचे नुकसान appeared first on पुढारी.