नाशिक : कळवणमध्ये सात, सुरगाण्यात 37 बीएसएनएल मनोर्‍यांना मंजुरी

bsnl www.pudhari.news

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
कळवण, सुरगाणा तालुक्यात बीएसएनएलचे 44 मनोरे मंजूर झाले असून, कळवण तालुक्यात सात, तर सुरगाणा तालुक्यात 37 मनोरे होणार आहेत. या नवीन मनोर्‍यांमुळे तालुक्यातील जनतेला व्यवसाय, ऑनलाइन शिक्षण व इतर कामकाजासाठी दुर्गम भागातही लाभ होणार आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कळवण, सुरगाणा मतदारसंघातील अनेक गावे दूरसंचार विभागाच्या दुर्लक्षामुळे मोबाइल सेवेपासून वंचित होते. त्यामुळे अतिदुर्गम भागातील आदिवासी व बिगर आदिवासी समाज दैनंदिन घडामोडीपासून कोसो दूर राहिला होता. मोबाइल कंपन्या व लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही मोबाइल सेवा मिळत नव्हती. केंदीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे मागणी केली होती. ना. डॉ पवार यांनी नागरिकांची अडचण ओळखून केंद्राच्या दूरसंचार विभागाकडे पाठपुरावा केला, त्यावर जिल्ह्यात 131 मनोर्‍यांना मंजुरी मिळाली आहे. नव्याने मंजूर झालेल्या मनोर्‍यांमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतमालाचे बाजारभाव, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, आरोग्यसेवा तसेच दैनंदिन व्यवहार व इतर महत्त्वाच्या कामांसाठी फायदा होणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कळवणमध्ये सात, सुरगाण्यात 37 बीएसएनएल मनोर्‍यांना मंजुरी appeared first on पुढारी.