नाशिक : काँग्रेसकडून ‘ब्लॉक प्रभारीं’च्या नियुक्त्या

काँग्रेस www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणी तसेच उमेदवारांच्या चाचपणीसाठी शहर काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या निर्देशानुसार विविध ब्लॉकमध्ये बैठका घेण्यासाठी जिल्हा प्रभारी डॉ. राजू वाघमारे व शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी प्रभारींची नियुक्ती केली आहे.

मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारीपदी ज्येष्ठ नेते नंदकुमार कर्डक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन नाशिक ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारीपदी माजी सभागृहनेते राजेंद्र बागूल, पंचवटी ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारीपदी ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, सातपूर ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारीपदी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संदीप शर्मा, तर नाशिकरोड ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारीपदी माजी सभागृह नेते डॉ. सुभाष देवरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

नवनियुक्त प्रभारींचे प्रदेश पदाधिकारी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष हनिफ बशीर, माजी नगरसेविका वत्सला खैरे, आशा तडवी, महिला शहराध्यक्ष स्वाती जाधव, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष अल्तमश शेख, उद्धव पवार, विजय पाटील, बबलू खैरे, दिनेश निकाळे, कैलास कडलक आदींचे काैतुक केले.

हेही वाचा :

The post नाशिक : काँग्रेसकडून 'ब्लॉक प्रभारीं'च्या नियुक्त्या appeared first on पुढारी.