नाशिक : कांद्याला किमान ‘इतका’ भाव मिळावा; राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर

कांदा,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार (दि. १०) सकाळी १० वाजता चांदवड येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी दिली.

कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर व अन्य भाजीपाल्याचेही भाव रसातळाला गेल्याच्या निषेधार्थ तसेच भाजप सरकारने केलेल्या घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चांदवड शहरातील मुंबई –आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदोलनात पक्षाची पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कांद्याला किमान 'इतका' भाव मिळावा; राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर appeared first on पुढारी.