नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ईशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करावी, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना केल्या आहेत.
शहरातील अमरधाम परिसरातील काझीगढी धोकादायक स्थितीत आहे. यासंदर्भात पूर्वीदेखील बैठका घेत उपाययोजनांसंदर्भात सूचना दिल्या आहेत. मात्र, आजही या विभागात काही रहिवासी राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करावी. याठिकाणी धोकादायक घरांमध्ये कुणी राहत असल्यास त्यांना इतरत्र स्थलांतरित करावे, अशाही सूचना ना. भुसे यांनी केल्या आहेत. दरम्यान, ईशाळवाडी घटनेच्या पार्श्वभूमीवर ना. भुसे यांनी तातडीने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याशी संपर्क साधत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच नाशिककरांनी धोकादायक ठिकाणाहून बाजूला सुरक्षित ठिकाणी थांबावे. काही अडचण असल्यास तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ना. भुूसे यांनी जिल्हावासीयांना केले आहे.
हेही वाचा :
- नाशिक सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्ब असल्याच्या खबरीने उडाली धावपळ
- अरे व्वा..! पवना धरण निम्मे भरले
- Irshalwadi Landslide Incident : डोंगर रात्री कोसळला; माहिती सकाळी मिळाली
The post नाशिक : काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करा ; पालकमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना appeared first on पुढारी.