नाशिक : कामगारानेच लांबविले सराफाचे साडेसहा लाखांचे दागिने

सोने चोरीला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

सराफी दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातून सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला असून, याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अजित नागरे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या सराफी दुकानात काम करणारा संशयित सुरेंद्रकुमार कामलेह किशोर वर्मा याने 20 ते 24 रोजी दरम्यान एक लाखाची सोन्याची पोत, 50 हजारांची लहान पोत, एक लाख 5 हजारांची पोत व इतर सोन्याचे दागिने असा सुमारे सहा लाख 30 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : कामगारानेच लांबविले सराफाचे साडेसहा लाखांचे दागिने appeared first on पुढारी.