
नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा
एक मे कामगार दिनाचे औचित्य साधत नांदगाव पंचायत समितीच्या वतीने नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जिल्हयात नदी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
गोदावरी नदी स्वच्छतेसोबतच जिल्हयातील नदी, नाले येथेही स्वच्छता मोहिम राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले. त्यानुसार गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव तालुक्यातील रुईची नदी येथे तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायत गंगाधरी अंतर्गत सदर माहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी येथील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्यांनी ट्रॅक्टर व स्वच्छतेचे साहित्य उपलब्ध करुन दिले. पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यात श्रमदान करत नदी स्वच्छता मोहिम राबविल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने समाधान व्यक्त केले आहे. यावेळी श्रमदानातून जवळपास दोन ते तीन ट्रॅक्टर कचरा कर्मचाऱ्यांनी काढत नदीचे पात्र स्वच्छ केले. यावेळी पंचायत समितीच्या कर्मचारी वर्गाने उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदविला.
कामगार दिनाच्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आम्ही नदी स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये आमच्या कर्मचारी वर्गाने देखील चांगला प्रतिसाद दिला. तसेच गंगाधरी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. – गणेश चौधरी, गट विकास आधिकारी नांदगाव.
हेही वाचा:
- क्रांती रेडकरचा मराठमोळा लूक
- Met Gala : पापराझींनी रेड कार्पेटवर आलियाला ऐश्वर्या समजलं अन्…
- NHRC च्या ८ व्या शॉर्ट फिल्म स्पर्धेत मराठी ‘चिरभोग’ ला पहिले पारितोषिक
The post नाशिक : कामगार दिनी नांदगाव पंचायत समिती मार्फत नदी स्वच्छता मोहिम appeared first on पुढारी.