नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार

Road Accidents

नाशिक : कार व दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबकरोडवर घडली. शुभम सुरेश वासाळकर (२६, रा. शिवशक्ती चौक, सिडको) असे या युवकाचे नाव आहे. रविवारी (दि.४) रात्री अकराच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील उज्वल एजन्सीजवळ झालेल्या अपघातात शुभम गंभीर जखमी झाले होते.

त्यांना जिल्हारुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कार व दुचाकीतील अपघातात युवक ठार appeared first on पुढारी.