नाशिक: काळ्या बाजारात विकला जाणारा रेशनचा तांदूळ सिनेस्टाईलने पकडला

नाशिक

सिडको (नाशिक), पुढारी वृत्तसेवा : काळ्या बाजारात विकला जाणारा हजारो किलो तांदूळ सिनेस्टाईलने शिवसेना महानगरच्या कार्यकर्त्यांनी पकडला. यामूळे सिडको परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तांदळाची १० ते १२ पोती घेऊन जात असलेली रिक्षा (क्र. एम १५ ई.एच. ३३२६) सिडको परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी पकडली. यासंदर्भात महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. यानंतर तात्‍काळ जिल्हा पुरवठा कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तांदळाची पोती भरलेली रिक्षा व चालकाला ताब्यात घेतले. अर्जून स्वामी असे रिक्षा चालकाचे नाव असून तो पंचवटीत येथे राहतो. अधिका-यांनी याची कसून चौकशी केली; परंतु त्याने संबंधित रेशन दुकानदाराचे नाव सांगितले नाही.  या  प्रकरणाचा तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

शिवसेनेचे पंकज जाधव, नाना पाटील, सुभाष गायधनी, अविनाश काकडे, दिग्विजय सोनवणे, कुणाल सोनवणे आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर रिक्षा, तांदळाच्या गोण्या व रिक्षा चालकास पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासंदर्भात रेशन ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शासनाच्या वतीने गोरगरिबांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले धान्य हे काळ्या बाजारात विकले जात असल्याची बाब शिवसेना कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी हा  माल पकडून दिला. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले असता त्यांनी पंचनामा केला. केवळ रिक्षा चालकावर कारवाई न करता संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई करावी.

सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख 

हेही वाचा : 

The post नाशिक: काळ्या बाजारात विकला जाणारा रेशनचा तांदूळ सिनेस्टाईलने पकडला appeared first on पुढारी.