
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पुरुषांनी महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी विनयभंग, मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे.
शनिवारी (दि.३) रात्री साडे आठ ते साडे नऊ या दरम्यान ही घटना घडली. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या सोसायटीत आल्यानंतर संशयिताने रस्त्यात गाडी आडवी लावली. त्यामुळे पीडितेने गाडी काढण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने संशयिताने पीडितेसह तिच्या पतीस शिवीगाळ करीत मारहाण केली व महिलेचा विनयभंग केला. तर इतर एका संशयित महिलेने लाठीने मारहाण केली. तर तिच्या वडिलांनी पीडितेस मारहाण करीत दमदाटी केली. तर दुसऱ्या गटातील पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीने घरात शिरून शिवीगाळ, मारहाण केली व विनयभंग केला. घरातील सामानाचे नुकसान केले, तसेच पतीसोबत झटापट करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ तोडून नुकसान केले व दोघांना दमदाटी केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- सेल्फी विथ बाप्पा…
- क्रिकेटपटू अर्शदीप याच्या विकिपीडिया प्रोफाइलशी छेडछाड, नावासमोर ‘खलिस्तान’ शब्द जोडला!
- उंडवडी : वाहून आलेली वाळू चोरीला जाण्याची भीती
The post नाशिक : किरकोळ वादातून महिलांचा विनयभंग, परस्परविरोधी गुन्हे दाखल appeared first on पुढारी.