Site icon

नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला ‘हा’ निर्धार

निफाड (जि. नाशिक) : प्रतिनिधी

शेतीसाठी पाण्याप्रमाणेच वीज देखील अत्यावश्यक बाब बनलेली आहे. विजेमुळे आपले शेतीचे उत्पन्न वाढलेले आहेत. म्हणून आप आपले शेतीपंपाचे वीज बिल भरणे हे शेतकऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. महाराष्ट्र शासनाची कृषी वीज वितरण 2020 योजना शेतकरी बांधवांच्या लाभाची असल्याने शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी केले.

विद्युत वितरण कंपनीच्या विज बिल वसुली अभियाना अंतर्गत कीर्तनाच्या माध्यमातून वीज बिल वसुलीचे आवाहन करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम नागरे यांनी सुरू केला आहे. निफाड तालुक्यातील गोंडेगाव येथे त्यांच्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरे यांच्या आवाहनाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सरपंच निकम यांनी गावातील सर्व कृषी पंप धारक शेतकरी वीज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले.

विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी भोर व जनमित्र शेवरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून सर्वांमध्ये विज बिल भरण्याबाबत जनजागृती केली. यावेळी शामराव दाते, प्रभाकर कोकाटे, संजय दाते, अशोक खंगाळ, चिंधु वाघ, मधुकर पानगव्हाणे, चंदू दाते, शरद दाते, दिनकर दाते, किशोर दाते व इतर सर्व शेतकरी बांधव तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : कीर्तनातून वीजबिल भरण्याचं आवाहन, शेतकऱ्यांनी केला 'हा' निर्धार appeared first on पुढारी.

Exit mobile version