नाशिक : कुख्यात डेव्हिड गँगचा चौथा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

चंद्रपूर : तुकडोजी नागरी पतसंस्थेतील भ्रष्टाचार प्रकरणी माजी उपाध्यक्ष, व्यवस्थापकासह चौघांना अटक

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील डाक बंगला येथील विशाल ठवळे याच्या खुनाच्या गुन्ह्यातील चौथ्या आरोपीला इगतपुरी पोलिसांनी गजाआड केले आहे. शहरातील कुख्यात डेव्हिड गँगच्या चौथ्या आरोपी पप्या पठारे उर्फ कृष्णा किशोर पेठारे याला पकडण्यात इगतपुरी पोलिसांना यश आले आहे.

नाशिक : ‘त्या’ भाविकाचा घातपातच; निव्वळ मोबाइलवरून केला खून

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रेल्वे तलाव येथे अंघोळीसाठी गेलेल्या विशाल चंद्रकांत ठवळे (36, रा. डागबगंला, इगतपुरी) या विवाहित तरुणावर रविवारी दि.22 मे 2022 दुपारी 3 च्या सुमारास अज्ञातांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्याने यात विशाल ठवळे याचा कुठल्यातरी धारदार शस्त्राने विशालच्या मानेची नस कापून पुन्हा वार करणार तोच विशालने जोराची किंकाळी मारल्याने अज्ञात पसार झाले. मदतीसाठी धावा करणार्‍या विशालचा अतिरक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यू झाला होता. फरार गुन्हेगाराला शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. यातील संशयित अज्ञात आरोपी फरार झाले होते.

या आरोपींना आतापर्यंत अटक
आतापर्यंत इगतपुरी शहरातील कुख्यात डेव्हिड गँगमधील कुख्यात गुन्हेगार जॉन पॅट्रिक मॅनवेल उर्फ छोटा पापा (22), अजय पॅट्रिक मॅनवेल उर्फ आज्या (27, दोघे रा. गायकवाडनगर, इगतपुरी), अजय राजू पवार उर्फ अजय टाकल्या (23) व पप्या पठारे उर्फ कृष्णा किशोर पेठारे (22, रा. साठेनगर, हनुमान मंदिराजवळ, औरंगाबाद) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कुख्यात आरोपींना अटक केल्यामुळे इगतपुरी शहरातील दहशत काही अंशी कमी झाली असून पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांचे शहरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कुख्यात डेव्हिड गँगचा चौथा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.