नाशिक : कुरापत काढून सासु व जावयावर कोयत्याने हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मागील भांडणाची कुरापत काढून एकाने युवकासह त्याच्या होणाऱ्या सासुवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना आनंदवली येथील मनपा शाळेच्या जवळ घडली. या हल्ल्यात चेतन दत्तू बेजेकर (२५, रा. कोळीवाडा) व सविता नेताजी शिंदे (४०, रा. जाधव मळा, आनंदवली) हे दोघे जखमी झाले आहे.

चेतन याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो त्याची होणारी पत्नी, सासु व मेव्हण्यासोबत आनंदवली येथील शाळेच्या मैदानात शनिवारी (दि.१) रात्री गरबा बघत होता. त्यावेळी संशयित मनोहर रामकिसन गायकवाड (२३, रा. माळीवाडा, आनंदवली) हा तेथे आला व त्याने मागील भांडणाची कुरापत काढून चेतनवर कोयत्याने वार केला. चेतनच्या गळ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यास वाचवण्यासाठी सासु सविता यांनी मध्यस्थी केली असता मनोहरने त्यांच्यावरही कोयत्याने वार केल्याने त्यांच्या हातास दुखापत झाली. मनाेहरने दोघांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मनोहर विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कुरापत काढून सासु व जावयावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.