नाशिक: कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून लवकरच बालनाट्य कार्यशाळा; सहभागी व्हा

कालातीत नाटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने 19 ते 21 मे दरम्यान तीनदिवसीय बालनाट्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 10 ते 15 वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून या कार्यशाळेत हसत खेळत नाट्यशास्त्र शिकवले जाणार आहे. नाटकाच्या माध्यमातून मुलांची विविध विषयांबद्दलची उत्सुकता वाढविणे, अभ्यासू वृत्ती जोपासणे, बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकास, सौंदर्यदृष्टी, निर्मिती क्षमता, भाषा, पंचेंद्रिये, शब्द, साहित्य याद्वारे होणारा विकास हे कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. शुक्रवारी (दि.19) नाट्य कार्यशाळेस प्रारंभ होणार असून, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजता कार्यशाळा स्वगत सभागृह, कुसुमाग्रज स्मारक, गंगापूर रोड येथे होणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक: कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून लवकरच बालनाट्य कार्यशाळा; सहभागी व्हा appeared first on पुढारी.