नाशिक : कृषीथॉनला 24 नोव्हेंबरपासून प्रारंभ

कृषीथॉन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बदलत्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने “कृषीथॉन” प्रदर्शनाचे दि. 24 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ड्रोन, विविध अ‍ॅप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निविष्ठा संस्था, कंपन्यांनी घेतलेला सहभाग यंदाच्या कृषीथॉनचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

कोरोना महामारीच्या तब्बल दोन वर्षांनंतर कृषीथॉनच्या 15 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येत आहे. पाच दिवस चालणार्‍या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय न्याहारकर बोलत होते. न्याहारकर म्हणाले की, शेतकरीवर्गामध्ये या प्रदर्शनाची ओळख अधोरेखित झाली आहे. बदलत्या प्रवाहात शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने या कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न अखंडपणे सुरू आहे. कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसाराचा हा वसा सार्थ ठरवत कृषी क्षेत्रांचे उत्पादन वाढावे, आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचावे याकरिता विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍याला देण्याचा आमचा प्रयत्न असून, कृषी क्षेत्रासह संलग्न क्षेत्राचा विकास व्हावा असाही प्रयत्न करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. शेतीमध्ये उत्पादनाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जातात. नवनवीन तंत्रज्ञान, अवजारे विकसित केले जातात. मात्र, त्यांची माहिती तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कृषीथॉन प्रदर्शनासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून हे प्रयोग एका छताखाली शेतकर्‍यांना पाहायला मिळणार आहे. कृषीथॉनमध्ये यंदा “बोल भिडू…” कृषीथॉन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी “प्रश्न शेतकर्‍यांचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे” या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंब उत्पादक आणि दुग्ध व्यावसायिकांच्या प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक साहिल न्याहारकर यांनी दिली.

प्रदर्शनात तीनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग…
कृषीथॉनमध्ये यंदा तीनशेहून अधिक नामांकित कंपन्या आणि संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. तसेच कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे, अवजारे, ट्रॅक्टर, ठिबक व तुषार सिंचन, फवारणी यंत्रे उत्पादक कंपन्या, बँका, विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, विविध कृषिपूरक उद्योग, नर्सरी, अन्नप्रक्रिया उद्योग तसेच कृषिविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असेल.

या पुरस्कारांचा समावेश…
कृषीथॉनच्या 15 व्या आवृत्तीत ङ्गप्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कारफ (पुरुष गट), ङ्गप्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कारफ (महिला गट), ङ्गप्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कारफ, ङ्गप्रयोगशील युवा संशोधक पुरस्कारफ, ङ्गप्रयोगशील कृषीविस्तार कार्यफ, ङ्गगुणवंत कृषी विद्यार्थी पुरस्कारफ या पुरस्कारांचा समावेश आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कृषीथॉनला 24 नोव्हेंबरपासून प्रारंभ appeared first on पुढारी.