नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी ताराबाई माळेकर बिनविरोध

म्हसरूळ (जि.नाशिक) : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी ताराबाई माळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रोटेशनप्रमाणे रवींद्र भोये यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. गुरुवारी (ता.११) सकाळी ११ वाजता बाजार समिती कार्यालयात ही निवडप्रक्रिया पार पडली. बाजार समितीच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित उपसभापतीपदी माळेकर यांनी दिली.   

उपसभापतीपदासाठी ताराबाई माळेकर यांचा एकमेव अर्ज

सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गुरुवार (ता.११) सकाळी साडे दहा वाजता सभापती देविदास पिंगळे यांच्यासह रवींद्र भोये, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, शंकर धनवटे, प्रभाकर मुळाणे, संजय तुंगार, भाऊसाहेब खांडबहाले, संपत सकाळे, विश्वास नागरे, युवराज कोठुळे, जगदीश अपसुंदे, चंद्रकांत निकम, संदीप पाटील, शाम गावित, ताराबाई माळेकर, विमल जुंद्रे, हे संचालक बाजार समितीमध्ये दाखल झाले. सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक फैय्याज मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. उपसभापतीपदासाठी ताराबाई माळेकर यांचा एकमेव अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच यावेळी बाजार समिती सचिव अरुण काळे, सहायक सचिव आर. एन. घोलप व एन एल बागुल, मुख्य लिपिक एम ए म निकाळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील राजेश आव्हाड उपस्थित होते.तसेच कॉगेस चे  आमदार हिरामण खोसकर व त्रांबक तालुक्यातील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

कोरोनामुळे मुदतवाढ
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही निवडप्रक्रिया लांबली होती. कोरोनामुळे सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने मुदतवाढ दिली होती. सध्या नाशिकमध्ये कोरोनाचे प्रमाण आटोक्यात असल्यामुळे ही निवडप्रक्रिया पार पडली.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

सभापती देविदास पिंगळे व सहकारी संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकत उपसभापतीपदी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आजवर शेतकरी हिताचीच कामे करीत आलो. यापुढेही ही कामे करीत राहील. संचालक मंडळाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.- ताराबाई माळेकर, उपसभापती, नाकृउबा समिती