Site icon

नाशिक : कृषी विभागात मकरसंक्रांत-भोगी सणानिमित्ताने पौष्टीक तृणधान्य पाककृती साजरी

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत, भारत सरकारच्या व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघाने – 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष – 2023 म्हणून घोषित केल्याने त्याअंतर्गत “मिलेट ऑफ मंथ” ही संकल्पना राबविण्यात आली. त्यामध्ये महिनाप्रमाणे जानेवारीमध्ये- बाजरी, फेब्रुवारी- ज्वारी, ऑगस्ट-राजगिरा, सप्टेंबर – राळा, ऑक्टोबर-वरई, डिसेंबर-नाचणी यानुसार आहारातील बाजरी, वरई आणि ज्वारी यांचे महत्व पाककृतीव्दारे पौष्टीक तृणधान्य अभियान योजनेचे महत्व स्पष्ट करण्यात आले.

संक्रात भोगीच्या पार्श्वभूमीवर बाजरी तृणधान्य विशेष महिना म्हणून जानेवारी हा समर्पित महिना करण्यात आला असून हिवाळ्यामध्ये सर्दी-खोकला, विविध संक्रमण, विषाणूजन्य समस्यांपासून बचाव, पचनसंस्था निरोगी राखण्यासाठी हिवाळ्यात बाजरीचे सेवन हितकारक असते, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरी हा एक उत्कृष्ट पर्याय असून हिमोग्लोबिनचा स्तर वाढविण्याकरीता बाजरी उपयुक्त आहे. संक्रांत -भोगी सणाला बाजरीच्या भाकरीला पारंपरिक महत्व असून रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि निरोगी राहण्यासाठी बाजरीचे जे उष्ण गुणधर्मीय असून त्याचे सेवन गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक पदार्थासोबतच बाजरी, ज्वारी यापासून बेकरीचे पदार्थ खारी, टोस्ट, नानकटाई आणि बाजरीचा पिझ्झा सुध्दा बनवतो येतो, हे यावेळी सांगण्यात आले.

नाशिक : कर्मचाऱ्यांंना पाककृती सहभाग नोंदविणाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष – 2023 निमित्त कृषी विभागाकडून विविध पदार्थांच्या पाककृती कर्मचा-यांनी स्वत: करुन आणल्या. यावेळी उपस्थित विभागाच्या सर्व पदाधिका-यांनी या पदार्थांचा आस्वाद घेत कर्मचा-यांचे कौतुक केले. त्यानंतर कर्मचाऱ्यांंना पाककृती सहभाग नोंदविणाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, भुसंपादनचे नितीनकुमार मुंडावरे, उपजिल्हाधिकारी, मनरेगा विवेक सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गोकुळ वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र पाटील, विभागीय व्यवस्थापक, एम.ए.आय.डी.सी. तंत्रअधिकारी जयंत गायकवाड, विस्तार, विश्वास बर्वे, तंत्र अधिकारी, फलोत्पादन, रविंद्र वाघ, तालुका कृषी अधिकारी, नयन पाटील, मयुरी झोरे मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद व कृषी विभागातील आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नाशिक: पारंपरिक पदार्थांपासून बनवलेल्या पाककृती सादर करताना कर्मचारी.

पाककृतीमध्ये कृषी विभागाच्या कर्मचा-यांनी बनवले हे पदार्थ : नागलीपासून बिस्कीट, लाडू, भाकरी, केक, धिरडे, चकली, ढोकळे, बाजरीपासून भाकर, खिचडी, दशम्या, मुटके, वड्या, टिक्की, शंकरपाळे, पुरी, इडली, थालीपीट, ज्वारीपासून भाकर, धिरडे, ज्वारीचे घारे, चकल्या, भजी, आंबिल तसेच भगरीची खिचडी, खीर, राजगिराचा शिरा, तीळ बाजरीची भाकरी यामध्ये नागलीपासून बनवलेले गुलाबजामुन हा पदार्थ जास्त चित्तवेधक व रुचकर ठरला.

हेही वाचा:

The post नाशिक : कृषी विभागात मकरसंक्रांत-भोगी सणानिमित्ताने पौष्टीक तृणधान्य पाककृती साजरी appeared first on पुढारी.

Exit mobile version