नाशिक : कॅशिअरने मारला कंपनीच्या पैशांवर डल्ला, 13 लाखांचा गैरव्यवहार

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत नेक्सा सर्व्हिस सेंटर येथे कॅशिअर म्हणून नोकरी करणाऱ्या व्यक्तीने सुमारे १३ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अमोल सखाराम पवार (३२, रा. पाथर्डी फाटा) यांनी अंबड पोलिस ठाण्यात संशयित गुरुनाथ मुरलीधर भालेराव (३५) यांच्याविरोधात कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

गुरुनाथ हे नेक्सा सर्व्हिस सेंटर येथे कॅशिअर म्हणून काम करत असताना ११ ते २२ ऑक्टोबर दरम्यान त्यांनी कंपनीत जमा झालेली १२ लाख ८२ हजार ४९ रुपयांची रोकड कंपनीत जमा करणे आवश्यक होते. मात्र गुरुनाथ यांनी पैसे कंपनीत जमा न करता कोणालाही न सांगता स्वत:च्या फायद्यासाठी पैशांचा वापर करून कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी अंबड पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : कॅशिअरने मारला कंपनीच्या पैशांवर डल्ला, 13 लाखांचा गैरव्यवहार appeared first on पुढारी.