
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
रेकॉर्डवरील शिक्षा कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे कैद्यांना पॅरोल मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या प्रकरणात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील दोन संशयित तुरुंगाधिका-यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, 2017 मध्ये नाशिकरोड कारागृहात कार्यरत तुरुंगाधिकारी शामराव गीते, माधव खैरगे, वरिष्ठ लिपीक सुरेश डबेराव यांनी कारागृहात शिक्षाबंदी असलेल्या तीघा कैद्यांना शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच लाच घेऊन कारागृहातून बेकायदेशीरपणे सोडल्याचा आरोप होता.
कारागृह प्रशासनाच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी वरिष्ठांच्या निर्दशनास हा प्रकार आणला. कारागृह महासंचालकांनी अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. त्यात हे अधिकारी दोषी आढळल्याने तुरुंगाधिकारी सतीश गायकवाड यांच्या तक्रारीनुसार एप्रिल २०२२ मध्ये नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शिक्षा भोगणा-या कैदी व त्यांच्या नातेवाईकांकडून लाच घेऊन कैद्यांची शिक्षा कमी करून त्यांना तात्पुरत्या स्वरुपात कागदोपत्री खाडाखोड करून मुक्त किंवा शिक्षा कमी केल्याचे तक्रारीत उल्लेख आहे.
हेही वाचा :
- बेट भागातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट
- सांगलीसह सात बाजार समित्यांचा आजपासून निवडणूक कार्यक्रम
- खेड तहसीलची प्रशासकीय विभाजनाची मागणी; अप्पर तहसीलदार चाकण पदनिर्मितीची गरज
The post नाशिक : कैद्याकडून लाच घेणे भोवले, तुरुंग अधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी appeared first on पुढारी.