नाशिक : कॉलेजरोडवर दोघांवर कोयत्याने हल्ला

मारहाण

नाशिक : कुरापत काढून दोघांनी मिळून दोघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना कॉलेजरोडवरील छोटू कोल्हापुरी वडापाव येथे शनिवारी (दि.9) सायंकाळी घडली. या हल्ल्यात गजेंद्र भगवानदास माहौर (22), राहुल मूलचंद राजपूत (21, रा. अशोकस्तंभ, मूळ रा. मध्य प्रदेश) हे दोघे जखमी झाले आहेत.

गजेंद्र याच्या फिर्यादीनुसार संशयित राहुल राजेंद्र निरभवणे व राहुल संजय तुरे (दोघे रा. मखमलाबाद शिवार) यांनी कुरापत काढून मारहाण केली. रिक्षातून आणलेले पाणी बाटल्यांचे खोके खाली उतरवण्याच्या कारणावरून दोघांनी वाद घातला. त्यानंतर राहुल निरभवणे याने त्याच्याकडील कोयत्याने गजेंद्रच्या कपाळावर वार करीत दुखापत केली. त्यानंतर निरभवणे व तुरे यांनी मिळून राहुल राजपूत याच्या डोक्यावर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कॉलेजरोडवर दोघांवर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.