नाशिक : कोळगावला साठवणुक केलेल्या मका बिट्याला आग

maka www.pudhari.news

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

कोळगाव येथे माजी सैनिक असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात पाच एकर क्षेत्रातील काढणी करून साठवून ठेवलेल्या मकाच्या बिट्यांना गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान झाले आहे.

माजी सैनिक असलेले शेतकरी संदीप केशव धनवटे यांनी आपल्या पाच एकर शेतीतील मका पिका काढून तीच्या बिट्या साठवून ठेवल्या होत्या. मात्र दुपाच्या सुमारास बिट्यांच्या गंजीला अचानक आग लागली. यावेळी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी येवला अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच एकत्र येत मिळेल त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच फारसा उपयोग झाला नाही. यात संपूर्ण बिट्या खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पिडीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत असून होत आहे. आग विझविण्यासाठी सरपंच संदीप गायकवाड, हिरालाल सानप, गोरख माळी, धोंडीराम गायकवाड, विलास गाडे, योगेश धनवटे, रमेश शिंदे, बाबुराव धनवटे, गोकुळ गाडे, दिलीप गिडघे आदींनी प्रयत्न केले.

हेही वाचा:

The post नाशिक : कोळगावला साठवणुक केलेल्या मका बिट्याला आग appeared first on पुढारी.