नाशिक क्राईम : कोयता घेऊन फिरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

crime

शस्त्रासह दोघे ताब्यात

नाशिक : काेयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना मुंबईनाका पोलिसांनी पकडले आहे. आदित्य परशुराम गदादे व अजय संतोष पेढेकर (दोघे रा. बजरंगवाडी) असे पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस शिपाई सागर जाधव यांच्या फिर्यादीनुसार, दोघे संशयित शनिवारी (दि.२३) रात्री सव्वा दहा वाजता बजरंगवाडी परिसात कोयता घेऊन फिरताना आढळून आले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.

वृद्धाच्या मृत्यू प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा

नाशिक : सातपूर विभागीय कार्यालयासमोर झालेल्या अपघातात सुरेंद्र प्रसाद सिंग (६०, रा. राजवाडा) यांचा गुरुवारी (दि.२०) मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी एमएच १५ जेबी २५५८ क्रमांकाच्या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरेंद्र सिंग हे गुरुवारी सायंकाळी सात वाजता पायी जात असताना दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस तपास करीत आहेत.

टायर, रोकड लंपास

नाशिक : दुकानाचे शटर तोडून चोरट्याने टायर, जॅक, सीसीटीव्ही व रोकड असा २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. पळसे येथील समृद्धी टायर्स शॉप येथे शनिवार ते रविवारी (दि.२२ ते २३) ही घरफोडी झाली. याप्रकरणी खंडू मसाजी खंडारे (४२, रा. कॅनलरोड, शिंदे) यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सातपूरला जुगाऱ्यांवर कारवाई

नाशिक : सातपूर येथील बजरंग नगर परिसरातील मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या व खेळवणाऱ्या चौघांवर सातपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. रविवारी (दि.२३) हॉटेल अण्णाच्या मळ्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पोलिसांनी दुपारी ३.४५ वाजता कारवाई केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक क्राईम : कोयता घेऊन फिरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.