नाशिक क्राईम : तलवारीने केक कापणारा गजाआड

crime

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

आडगाव पोलिस ठाणे हद्दीतील शिलापूर येथे काही मुलांनी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करत परिसरात दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नांची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधिताना अटक केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच गुन्हे शोध पथकाने याबाबत तपास यंत्रणा हलविली. संशयित गणेश कमलाकर दिवे (१९, रा. एकलहरे) आणि शिलापूर गावातील एक विधिसंघर्षित बालकाला तलवार बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस अंमलदार निखिल वाकचौरे यांनी फिर्याद दाखल करीत कारवाई केली.

हेही वाचा :

The post नाशिक क्राईम : तलवारीने केक कापणारा गजाआड appeared first on पुढारी.