नाशिक क्राईम : लिव्ह इनमधील प्रेयसीची पाठीत चाकू खुपसून हत्या

Nashik Murder

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घरगुती किरकोळ कारणातून युवकाने प्रेयसीच्या पाठीत चाकू खुपसून हत्या केल्याची खळबळजनक घटना हाेलाराम काॅलनीतील होलाराम कॉलनी, कस्तुरबानगर परिसरात उघडकीस आली. आरती श्याम पवार (२९)असे मृत प्रेयसीचे नाव आहे. पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित प्रियकर श्याम अशाेक पवार (३२, रा. मल्हारखाण, अशाेकस्तंभ) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती पवार हिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला हाेता. काैटुंबिक कारणातून तिचा पती तिला साेडून दुसरीकडे राहायला आहे. याच कालावधीत तिची ओळख हमाली काम करणाऱ्या श्याम पवार याच्याशी झाली. काही दिवसांत ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ती मुलांसह श्यामसाेबत राहत हाेती. किरकोळ कारणातून आरती व श्याममध्ये वारंवार वाद होत होते.

दोन दिवसांपूर्वी अर्थात मंगळवारी (दि. १५) रात्री नऊ वाजता श्याम याने काही कारणास्तव मुलाला चापट मारली. याबाबत आरतीने श्यामला जाब विचारला असता दाेघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतप्त झालेल्या श्यामने किचनमधील धारदार सुरी आरतीच्या पाठीत खुपसली. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदनात आरतीच्या पाठीत एक छाेटी जखम दिसली. त्यामुळे तिचा मृत्यू नैसर्गिक नसून, खून केल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत श्याम पवारविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

काैटुंबिक कारणातून आरती पवार यांचा पती दुसरीकडे राहायला आहे. तेव्हापासून मृत आरती आणि संशयित श्याम पवार हे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक क्राईम : लिव्ह इनमधील प्रेयसीची पाठीत चाकू खुपसून हत्या appeared first on पुढारी.