नाशिक : खडकजांबला अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार

नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील खडकजांब येथील वयोवृद्ध महिला मुंबई आग्रा महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत महिला गंभीर झाल्याने दवाखान्यात उपचार सुरु होते. यावेळी वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या घटनेबाबत सुनील एकनाथ भानदुर्गे (४१, मुळचे रा. लोणार सरोवर बुलढाणा, हल्ली रा. खडकजांब) यांनी  माहिती दिल्याने वडनेरभैरव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर येथील मुळचे रहिवाशी असलेले सुनील एकनाथ भानदुर्गे (४१) कुटुंबीयांसमवेत खडकजांब (तां.चांदवड) येथे राहतात. त्यांच्या ६० वर्षीय आई खडकजांब येथील मुंबई आग्रा महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वयोवृद्ध आईला गंभीर मार लागल्याने तिला पिंपळगाव बसवंत येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना वयोवृद्ध आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसात अज्ञात वाहनचालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक माळी करीत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : खडकजांबला अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार appeared first on पुढारी.