
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
खडकजांब गावातील मुंबई-आग्रा महामार्गाने भरधाव जाणाऱ्या दुचाकीस्वारास महामार्ग ओलांडत असलेल्या व्यक्तीकडील लाकूड लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी वडनेरभैरव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुनेश रमेश बग्गन (३५, रा. एकलहरे कॉलनी, नाशिक) असे मृताचे नाव आहे. बग्गन हे चांदवड तालुक्यातील खडकजांब गाव शिवार मुंबई-आग्रा महामार्गाने दुचाकी (एम. एच. १५, बी. जी. ३९०४)ने नाशिककडे चालले होते. त्याचवेळी महामार्ग ओलांडत असलेल्या व्यक्तीजवळील लाकडास त्याचा धक्के लागल्याने ते खाली पडले. याचवेळी त्यांच्या डोक्यावरील हेल्मेट निघून गेल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मालती अनिल सोनवणे (४०, एकलहरे) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास व्ही. एन. घुमरे करीत आहेत.
हेही वाचा:
- dharmveer : धर्मवीरचा दुसरा भाग २०२४मध्ये : मंगेश देसाई
- Tunisha Sharma: तुनिषाच्या मृत्यूनंतर आता मालिका सेटवर असतील काउन्सलर
- जळगाव : उच्चांकी भाव मिळाल्याने केळीउत्पादकांमध्ये आनंद
The post नाशिक : खडकजांबला अपघातात दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.