नाशिक : खडकजांबला मोटरसायकल अपघातात एक ठार

अपघात

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गाने भरधाव वेगात जाणाऱ्या मोटरसायकल चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी स्लीप होऊन एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खडकजांब (ता. चांदवड) येथे घडली. या घटनेबाबत प्रकाश सोमनाथ पगार (३५) यांनी वडनेरभैरव पोलिसांत खबर दिल्याने दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वडनेरभैरव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकजांब येथील प्रकाश सोमनाथ पगार (३५) व आदेश भास्कर पगार हे दोघे मोटरसायकलने (एमएच १५ एचडी ३९२२) मुंबई-आग्रा महामार्गाने पिंपळगाव बसवंत दिशेकडे जात होते. यावेळी दुचाकी भरधाव वेगात असताना प्रकाश पगार यांनी अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी स्लीप झाली. या दुर्घटनेत पाठीमागे बसलेल्या आदेश पगार याच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याच‌ा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गौतम तायडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक डी. पी. दोडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : खडकजांबला मोटरसायकल अपघातात एक ठार appeared first on पुढारी.